आता जणू बाबांना पंढरपूरचे वारी करावीशी वाटू लागले श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांच्या अंतःकरणात दिवसेंदिवस अधिकच प्रकार होत होती पवित्र वृत्तीच्या माळसा माता नाही त्यांच्या या संकल्पना आनंदाने अनुमोदन दिले प्रवासासाठी आवश्यक खर्च दिला प्रेमाने शिदोरी आणि विठ्ठल दर्शनाचे तळमळ याच दोन गोष्टी जनु बाबांच्या प्रवासाचे खरी ताकद ठरल्या भक्तांच्या आमदारांना जेव्हा विठ्ठल भेटीचे आज निर्माण होते तेव्हा प्रत्येक पाऊल आपोआप पंढरीच्या दिशेने वळू लागते.
एकदा पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने जात असताना एका घरासमोर भाविकांची मोठी गर्दी दिसली चौकशी केली असता समजले की वारकरी संप्रदायातील अत्यंत अधिकारी व्यक्तिमत्व सर्वांच्या श्रद्धेचे आणि आदराचे स्थान असलेले हरिभक्त परायण लक्ष्मण बुवा वाघोलीकर येथे मुक्कामी आहेत बाहेर त्यांच्या नावाचा फलक ही लावलेला होता सद्गुरूंची भेट ही योगायोग नसते ती ईश्वराने आधीच निश्चित केलेली उपाययोजना असते जनावा जन्मातच ज्ञान आणि वैराग्य घेऊन आले होते तरीही त्यांनी गुरुपरंपरेचे महत्व मनोभावे स्वीकारले.
उपजत ज्ञानी अशा अवतार पुरुषाने देखील गुरूंच्या चरणी नम्रतेने मस्तक टिकवून गुरुमंत्राचा अनुग्रह घेतला आहे त्याच पवित्र परंपरेचा आदर्श समोर ठेवून जणूबाबा हरिभक्त परायण लक्ष्मण बुवा वाघोलीकरांच्या चरणी उपस्थित झाले.
ह भ प लक्षण बुवा वाघोलीकर बाळा कुठून आलास ?
जणूबाबा गुरुवर्य मी दहेगाव इथून आलो आहेत.
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर काय व्यवसाय करतोय ?
जणू बाबा शेती हा माझा व्यवसाय आहे.
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर मग येथे येण्यामागचा हेतू काय ?
जणू बाबा गुरुदेव आपल्या श्रीमुखातून मंत्रानुग्रह प्राप्त व्हावा. हीच माझी विनम्र इच्छा आहे.
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर बरं सांग तुझी जमीन कशी आहे ?
जणू बाबा गुरुदेव जमीन कसदार आहे.
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर मशागत केलीस का ?
जणू बाबा होय नांगरणी व वखरणी हरळ, कुंदा सर्व तयारी पूर्ण केली आहे.
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर जमिनीत आता काय करणार
जणू बाबा येणार आहे गहू पेरणार आहे
लक्ष्मण बुवा क्षणभर स्मित हास्य करत म्हणाले बाळा जशी शेती पेरणीसाठी तयार केली तसेच तुझं अंतकरणही साधण्यासाठी तयार झाला आहे..... हे उजवा कान माझ्याकडे कर !
जणू बाबांनी अत्यंत नम्रतेने उजवा कान पुढे केला. लक्ष्मण बुवांनी त्यांच्या कानात गुरु मंत्राचा पवित्र उपदेश केला. त्या क्षणी गुरू कृपेचा दिव्य स्पर्श बाबांच्या अंतकरणात उतरला आणि त्यांच्या जीवनाला परमार्थाची नवी दिशा मिळाली.
गुरु मंत्र हा केवळ उच्चारला जाणारा शब्द नसतो तो जीवनाला ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारा दिव्य प्रकाश असतो. ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर नियमाने पंढरीची वारी करीत जा जनु बाबा गुरुदेव काही अडथळा आला आणि वारी करता आली नाही तर मला क्षमा करावी .
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर तसे असले तरी कचरू नकोस जेथे राहशील तेथून परमार्थाचे प्रेरणा जन सामान्यांना देत राहा तुझ्या प्रेरणांनी जर एखादा भक्त पंढरीची वाट धरू लागला तर त्या वारीचे पुण्य तुलाही लाबेल जा श्री विठ्ठल तुझ्या कार्याला यश देवो.
खरा वारकरी स्वतः पुरता भक्तिमार्ग चालत नाही, तो असंख्य जीवांना विठ्ठलाच्या चरणाशी जोडण्याचे पुण्यही कमावतो. जनु बाबांनी पुन्हा दंडवत घालून गुरुची विषम मागितले आणि प्ररतीचा प्रवास सुरू केला कालांतराने पायाची शक्ती सीन होत गेली नियमित पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे कठीण होऊ लागले, तेव्हा त्यांच्या अंतर्गत एक पवित्र संकल्प उदयास आला पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी गावातच प्रतिष्ठित केले तर नियमित दर्शन पूजा आणि सेवा घडेल.
जेथे भक्तीचा संकल्प शुद्ध असतो तेथे ईश्वर स्वतःला त्या संकल्पची पूर्तता करण्यासाठी मार्ग निर्माण करतो. तो संकल्प सत्य होतो कारण तो सत्पुरुषाचा संकल्प होता सत्य संकल्पाचा दात नारायण हे शास्त्र वचन अक्षरशः खरे ठरले मूर्ती मिळाल्या शुभ मुहूर्त मिळाला मंदिर मिळाले आणि प्राणप्रतिष्ठाही संपन्न झाली हा काळ इसवी सन 1939 चा असावा तर हा त्या घराजवळ दगड मातेचे एक छोटेसे मंदिर उभारण्यात आले. त्या मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आकर्षक मूर्तीची स्थापना झाली आणि परमार्थाच्या पवित्र कार्याचा मंगल श्री गणेशा झाला. जन्म कुंडलीतील फलादेशाप्रमाणे हे कार्य परमार्थिक आणि सार्वजनिक होते. त्यामागे स्वतः समाजाच्या कल्याणाची निर्मळ भावना होती.
मंदिरांची भव्यता दगड विटात नसते ती भक्तांच्या श्रद्धेत , सेवाभावात आणि ईश्वर निष्ठेत असते मंदिर लहान होते पण भावना विशाल होती मूर्ती लहान होत्या पण श्रद्धा पतंग होती नंदादपाची ज्योत छोटी होती पण तिचा आध्यात्मिक प्रवास असीम होता मंदिरातील घंटीचा आवाज लहान होता असला तरी त्याचा प्रतिध्वनी भाविकांच्या अंतर्गत दूरवर गोमात राहिला. त्या मंदिरात घंटेला स्पर्श न करता येईल निर्माण होणारी ध्वनी अनेक भाविकांनी स्वतः अनुभवले आणि आजही त्या अनुभूती श्रद्धेने सांगितल्या जातात तो केवळ चमत्कार लावतात तर सर्वव्यापी परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती आणि जणूबाबांच्या अखंड श्रद्धा भक्ती व गुरुपयोग गुरुकृपेने जागृत झालेल्या अध्यात्मिक शक्तीचे जिवंत अधिष्ठान होते. जनु बाबांनी उभारलेले ते छोटीशी मंदिर ही केवळ श्री विठ्ठल रुक्मिणीचे देवस्थान नव्हते, ते श्रद्धा, सेवा, नाम, भक्ती आणि गुरुकृपेच्या अखंड प्रेरणास्थान बनले. आजही त्या पवित्र स्मृती असंख्य भाविकांच्या अधा कानात भक्तीचा अखंड तेवत ठेवता.
पुढील भाग क्रमाश:
संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवन चरित्र दिव्य कार्य अलौकिक लीला आणि रोजची अमृतवाणी वाचण्यासाठी खालील लिंक ला आवश्यक भेट द्या.
🔗Janardanmauli.blogpost.com
माऊलींच्या विचाराचा प्रकाश भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संदेश आपल्या मित्र परिवारासोबत अवश्य शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या जीवनात आशेचा नवा केला निर्माण होऊ शकतो
#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र
#माऊली #चरित्र #जयबाबाजी #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra #amrutvani #koprgoan #nashik #verul

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा