🌸✨ जनुबाबांचा विरह, खुशालशेठांचे समर्पण आणि चरणांची दिव्य लीला ✨🌸
जनार्दनाला शिक्षा होण्याऐवजी खुशालशेठला शिक्षणाचा धडा मिळाला होता. खुशालशेठजींनी तो "धड्डा" धार्मिकतेने विनम्रतेने स्विकारला. खुशालशेठजी, त्यांचा परिवार, गडीमजुर, करंजगाव व लगतचे पाच दहा खेडयात स्वामीजीनी प्रामाणिक परिश्रमाचे व पावित्र्याचे महत्व पटवुन दिले होते.
आपण बघीतल होत की, दहेगावाहुन अपरात्री घर दार परिवार सोडुन स्वामीजी बाहेर निघाले तेंव्हा कोठे जायचे, कसे जायचे हे ठरविले नव्हते. मात्र कशासाठी जायचे हे नक्कीच ठरवले असावे. जे ठरविले तेच घडविले. आता येथे थांबण्याची आवश्यकता नव्हती. काही दिवस दहेगावचे रहिवाशांसाठी दिले पाहिजे. त्यांनाही दिव्यत्वाची महती समजुन त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्यामुळे जीवन कृतार्थ होते. याच विचारांनी स्वामीजींनी "करंजगाव कर्मभूमि" सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तो निर्णय ऐकुन सर्वजण गहिवरले. सोबत काम करणाऱ्या गडी माणसांनी स्वामीजींचे पाय धरले. झालेल्या चुकांची क्षमा मागु लागले.
"क्षमा करा अपराध ! महाराज तुम्ही सिध्द." सत्पुरूष नेहमीच क्षमाशील असतात. क्षमा करणेपुर्वीच पाहिले तर त्या गडीमजुरांच्या नेत्रातुन दुःखाश्रु वाहत होते. मनापासुन होणाऱ्या त्या पश्चात्तापाच्या अश्रुबिंदुनी त्यांचे अपराधाचे पाप कधीच धुवुन टाकले होते. तरीही त्यांना क्षमाशिल वृत्तीने स्वामीजींनी जवळ घेतले त्यांच्या पाठीवर हात ठेवुन प्रामाणिक परिश्रम पावित्र्यपूर्व करणेसाठी पाठबळ प्रदान केले. पलिकडे उभे असलेले खुशालशेठ भावविवश होवुन जवळ आले. स्वामीजींचे दोन्ही हात आपल्या छातीवर दाबुन म्हणाले, आजपर्यंत आपण जनु होता. आता आम्ही आपल्याला जनुबाबा म्हणणार आहोत. जनुबाबांचा जयजयकार जनुबाबा चला माझ्या बरोबर, खुशालशेठ उद्गरले. सर्व सोबत्यांचा, गायीवासरांचा निरोप घेवुन व खुशालशेठ व सर्व सोबत्यांना खुशहाल करून जनुबाबा खुशहाल शेठजींच्या मागे निघुन गेले.
शेतात काम करणारे तेच लोक होते, गायीगुरे तेच होते, खळे मळे अवजारे तेच होते, पण जनुबाबांच्या दूरवर निघुन जाण्याने सर्वांना येथील चैतन्य निघुन गेल्यासारखे वाटले. गडी माणसे खळयात स्तब्ध उभे होते. मात्र त्यांचे मन दूर जाणाऱ्या जनुबाबांच्या पाठमोऱ्या दर्शनासाठी मागे मागे जात होते. त्यांच्या मनाला महानतेची महती माहीत झाली होती. या ठिकाणी आणखी काही मिळवायचे राहीले नव्हते. जनुबाबा तुम्ही इतके वर्ष थांबून माझ्याकडुन काय मिळविले? गहिवरलेल्या शेठजींच्या या प्रश्नाला उत्तर देतांना जनुबाबा त्यांचेकडे पाहुन फक्त हसले, कारण जनुबाबांनी काय मिळविले ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नव्हती. म्हणुन दिल्याचे अधिकृत नोंदणीसह कागदपत्र जनुबाबांसमोर ठेवले. खशालशेठजींनी स्वतःचे मालकीची १२ एकर कसदार काळी जमिन जनबाबांना दानपत्र शेठजी हे काय आहे? तेंव्हा शेठजी म्हणाले असु द्या जनुबाबा तुमच्या प्रेमाची व सेवेची ही अंशतःउतराई आहे. कृपा करून काहीच मतप्रदर्शन न करता हे स्विकारा. जनुबाबा उत्तरादाखल म्हणाले, शेठजी आजपर्यंत आपला शब्द मोडला नाही. ठिक आहे. दरम्यान करंजगावी असतांना अशी एक घटना घडली होती की
पहाटेच्या ब्रम्हमुहुर्तावर थंड पाण्याने स्नान करून ध्यान धारणा करण्याचा स्वामीजींचा नियम होता. त्यानुसार जनुबाबा साधनेत बसलेले होते. डिसेंबर महिना, कडाक्याची थंडी, सर्व शिवार थंडीने निशःब्द होता. ना कुणाची हालचाल ना आवाज. आणि अचानक थंडीची लाट आली. कडकड वाजत सर्व लता, वेली, पिकांची स्थिती पांढरी फटक झाली. जनावरे थिजली, करंजगावची बोर नदी पाण्याऐवजी बर्फानी भरली. सृष्टीचे तापमान काही क्षणात न्युनतम झाले. त्याही अवस्थेत थंडपाण्याचे स्नान, उघडा देह, सिध्दासनाची बैठक आणि ध्यानातील तंद्री तशीच होती. प्रचंड शितकोपाची लहर कमरेखाली घोटाळुन बसली त्या प्रकोपाने पाय थिजले. पायाचे स्नायु आकसले. रक्तवाहीन्या संकुचित झाल्या. काही मिनिटात जनुबाबांना आपल्या पायांच्या संवेदना क्षिण झाल्याची जाणीव झाली, तोपर्यंत निसर्गप्रकोप पुढे निघुन गेला होता.
खुप प्रयत्न करूनही जनुबाबांना उभे राहता येईना. महत्प्रयासाने कसे तरी सरकत सरकत शेजारच्या कंपाउंडच्या भिंतीचा आसरा आणि आधार घेवुन तेथे बसले. सूर्य उगवला, उष्णता वाढली, वातावरण तापु लागले. परंतु जनुबाबांचे पाय अजुनही थंडच असल्यासारखे जाणवत होते. सोबतचे गडीमजुर जमले, चौकशी झाली, चर्चा झाली, उपचार झाले, परंतु जनुबाबांचे चरणाची शक्ती क्षिणच भासु लागली. हळु हळु थोडीशी प्रगती दिसली. चालता येत होते, पण चरणांची गति कमी झाली होती. त्याही अवस्थेत त्यांची आचरणाची गति अडकली नव्हती थबकली नव्हती थांबली नव्हती.
अवतारपुरूषांच्या दृष्टीने पाहाता जनुबाबा आचरणांचे आचार्य होते. त्या साधनेसाठी चरणांवर फारसे अवलंबुन राहाणेची त्यांना आवश्यकता वाटली नाही. न जाणो यात देखील नियतिचे नाटय असले पाहिजे. जनुबाबांचा भगवद्भक्तीच्या प्रचाराचा चालण्याचा वेग मंदावला नसता तर त्यांना प्राप्त करणे सामान्यांचे आवाक्याचे बाहेर झाले असते. आता जनुबाबा चालत होते पण बालकांच्या गतिने, धिमे धिमे आणि म्हणुनच असंख्य अबालवृध्दांना जनुबाबांच्या पाऊलावर पाऊल टाकुन परमार्थिक प्रगतिच्या दिशेने चालणे सोपे होत होते. भारतीय तत्वज्ञान कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीत सर्वांना सकारात्मक पाहण्याचे सुत्र सांगते. अर्थातच जे होते ते भगवंताच्या ईच्छेने होते, असे मानुन "जे होते ते भल्यासाठीच" म्हणुन स्विकारावे.


