शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२६

गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची जीवनगाथा


 सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज – जीवन गाथा

 वैयक्तिक परिचय व जीवनप्रवास

 एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान — सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा जीवनप्रवास हा त्याग, सेवा, साधना आणि अखंड गुरुनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास आहे. अध्यात्म, समाजसेवा, धर्मप्रसार आणि मानवकल्याण या कार्यांना त्यांनी आपल्या जीवनात विशेष स्थान दिले आहे.

वैयक्तिक परिचय

- जन्मदिनांक : ४ नोव्हेंबर १९५५

- जन्मस्थळ : पांजरवाडी, ता. येवला, जि. नाशिक

- मूळ नाव : देवरे तुळशीराम महादू

- गुरुदेव : राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज

- संन्यास नाव : स्वामी रमेशगिरी (गुरुमौनगिरी)

- सद्यपद : मठाधिपती — जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान, बेट–कोपरगाव

  ०१. जन्म व बालपण

सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पांजरवाडी येथे एका सुसंस्कृत मराठा कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव देवरे तुळशीराम महादू असे होते.

                बालपणापासूनच त्यांच्यामध्ये अध्यात्म, संतसेवा, समाजसेवा आणि धार्मिक कार्यांविषयी विशेष आवड होती. साधेपणा, सेवाभाव, कष्ट करण्याची वृत्ती आणि आध्यात्मिक जीवनशैली यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून झाले. याच संस्कारांनी पुढे त्यांच्या जीवनाला सेवाभावी आणि आध्यात्मिक दिशा दिली.

०२. शिक्षण 

त्यांचे प्राथमिक शिक्षण मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय, अंदरसूल तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर, मालेगाव कॅम्प येथे झाले. त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले.

           औपचारिक शिक्षण मर्यादित असले, तरी संतसाहित्य, ज्ञानेश्वरी, श्रीमद्भागवत आणि गुरुचरित्र यांसारख्या धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, चिंतन आणि मनन त्यांनी सातत्याने केले. या अभ्यासातून मिळालेले ज्ञान त्यांच्या प्रवचनांमध्ये, आध्यात्मिक मार्गदर्शनामध्ये आणि भक्तांशी होणाऱ्या संवादामध्ये प्रतिबिंबित होते.

०३. अध्यात्माकडे वाटचाल

बालपणापासूनच संतसाहित्य, नामस्मरण, संतांचा सहवास आणि समाजहिताची प्रेरणा यांचा त्यांच्या मनावर खोलवर प्रभाव होता. अध्यात्माच्या माध्यमातून समाजसेवा, धर्मकार्य आणि मानवकल्याणासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा विचार त्यांच्या मनात दृढ होत गेला.

            बालपणी नगरसूल येथे आयोजित सत्संगाच्या प्रसंगी त्यांना प्रथमच राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचे दर्शन घडले. या दर्शनाने त्यांच्या मनावर विशेष प्रभाव पडला. गुरुदेवांच्या दिव्य दर्शनातून त्यांना अध्यात्माची प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या जीवनाला अध्यात्माकडे वळण्याची दिशा प्राप्त झाली. हा प्रसंग त्यांच्या आध्यात्मिक जीवनप्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

०४. संन्यास दीक्षा 

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या सान्निध्यात त्यांची आध्यात्मिक वाटचाल अधिक दृढ झाली. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संन्यासमार्ग स्वीकारला. कोपरगाव बेट येथे गुरुदेवांच्या सान्निध्यात संन्यासदीक्षा प्राप्त होणे हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन गुरूसेवा, अध्यात्म, धर्मप्रसार आणि समाजकल्याणासाठी समर्पित केले.

             श्री क्षेत्र प्रयागराज येथे सन १९८६ मध्ये आयोजित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभप्रसंगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांनी १३ संन्यस्त मूर्तींना बीजाहोम संन्यासदीक्षा विधी प्रदान केला. यामध्ये परमपूज्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्यासह इतर १२ संन्यस्त शिष्यांचा समावेश होता.

              गुरुदेवांच्या हयातीत आणि त्यांच्या समाधीनंतरही त्यांनी तन, मन आणि धनाने गुरूसेवा व धर्मकार्य अखंडपणे सुरू ठेवले.

०५. स्वामींचे जीवन कार्य

आज सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज हे बेट–कोपरगाव येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या पवित्र समाधीस्थानाचे मठाधिपती म्हणून कार्य पाहत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पवित्र स्थानी अखंड नामस्मरण, नित्य पूजाविधी, धार्मिक अनुष्ठाने, गुरुमंत्रदीक्षा, अन्नदान, गोसेवा, युवक संस्कार, महिला सहभाग, व्यसनमुक्ती अभियान आणि आध्यात्मिक मार्गदर्शन अशी विविध कार्ये सुरू आहेत.

              राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या समाधीनंतर त्यांच्या पवित्र मुख्य समाधीस्थानाची सेवा करण्याचे भाग्य सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांना लाभले. गुरुदेवांच्या हयातीतच त्यांनी स्वामी रमेशगिरीजी महाराज यांना या भावी सेवेचे संकेत दिले होते. गुरुदेवांनी दिलेले ते संकेत कालांतराने प्रत्यक्षात साकार झाले आणि मुख्य समाधीस्थानाच्या सेवेसाठी महाराजांना संधी प्राप्त झाली. गुरुदेवांच्या इच्छेने आणि कृपाशीर्वादाने लाभलेली ही सेवा त्यांनी अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पित भावनेने स्वीकारली.

तीर्थयात्रा, दिंडी यात्रा आणि धार्मिक अनुष्ठाने

भाविकांना संतपरंपरेचा, तीर्थक्षेत्रांचा आणि धार्मिक संस्कारांचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाराजांच्या मार्गदर्शनाखाली विविध तीर्थयात्रा आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये कानिफनाथ मढी, पंढरपूर आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांच्या यात्रांचा समावेश आहे.

             रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ मढी येथे पायी दिंडी यात्रेचे आयोजन केले जाते. तसेच त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज दिंडी यात्रा आयोजित केली जाते. गाणगापूर येथे दरवर्षी गुरुचरित्र पारायणाचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवाच्या काळात कानिफनाथ मढी येथे नवनाथ पारायणाची धार्मिक परंपराही जपली जाते.

                या विविध उपक्रमांमधून भाविकांना भक्ती, नामस्मरण, संतसाहित्य आणि धार्मिक परंपरांचा अनुभव घेण्याची संधी मिळते. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अशा अनेक धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते.

नर्मदा परिक्रमा आश्रम आणि परिक्रमावासींची सेवा

माँ नर्मदा परिक्रमेच्या मार्गावर महाराजांनी एक भव्य आश्रम उभारला आहे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासी भाविकांना या आश्रमात दररोज दोन वेळचे मोफत भोजन उपलब्ध करून दिले जाते. परिक्रमेच्या कठीण प्रवासात भाविकांना अन्नसेवा मिळावी आणि त्यांच्या प्रवासाला आधार मिळावा, या भावनेतून ही सेवा सुरू आहे.

               या सेवाकार्यातून अन्नदान, अतिथीसेवा आणि मानवसेवा या मूल्यांचे दर्शन घडते. महाराष्ट्राबाहेरही राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचे नाव आणि आध्यात्मिक कार्य पोहोचविण्यात स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

समाधीस्थानाची आध्यात्मिक महिमा आणि अन्नदान सेवा

 राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या पवित्र समाधीस्थानावर भाविकांसाठी सात ते आठ दिवसांच्या पारायण व अनुष्ठान सेवेचे आयोजन केले जाते. या अनुष्ठानामध्ये भाविक फलाहारावर उपवास करून श्रद्धेने आणि नियमपूर्वक साधना करतात. तसेच सामुदायिक पद्धतीने मनातल्या मनात गुरुमंत्राचा जप केला जातो. गुरुदेवांनी समाधीस्थानासाठी निर्माण केलेल्या नित्यनियम विधींचे दररोज सकाळी व संध्याकाळी नियमित पठण केले जाते. ही पवित्र धार्मिक परंपरा सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही श्रद्धेने जपली जात आहे.

               बेट–कोपरगाव येथील मुख्य समाधीस्थान हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दररोज दोन वेळा भाविकांना मोफत प्रसाद दिला जातो. अन्नदानाच्या या सेवेमुळे दूरदूरून येणाऱ्या भाविकांना प्रसादाचा लाभ मिळतो.

             सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज केवळ कोपरगाव आश्रमासाठीच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीच्या काळजाचा प्राण आहेत. बाबांमध्ये कुणाला महादेव, कुणाला श्री चैतन्य कानिफनाथ, कुणाला संत रोहिदास, संत ज्ञानेश्वर माऊली, तर कुणाला साक्षात संत जनार्दन स्वामी दिसतात.

०६. राष्ट्रीय व सांस्कृतिक योगदान

धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहित यांविषयी जनजागृती करण्याच्या कार्यात सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात जनजागृती, जनसंपर्क आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी सहभाग नोंदविला.

             धार्मिक व्यासपीठांच्या माध्यमातून सनातन संस्कृती, राष्ट्रीय भावना आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश त्यांनी समाजापर्यंत पोहोचविला. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित धर्म संसद, संत संमेलन आणि विविध धार्मिक अधिवेशनांमध्येही त्यांचा विशेष सहभाग राहिला आहे.

            गर्भगिरी येथे प्रथम नाथ संमेलन आयोजित करण्यात त्यांच्या पुढाकाराची महत्त्वपूर्ण भूमिका होती. नाथ, वारकरी, दत्त, गिरी आणि इतर हिंदू धार्मिक परंपरांमध्ये समन्वय साधण्याच्या कार्यातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.

 जीवनमूल्ये आणि आचार

गुरुपरंपरेतून प्राप्त झालेली जीवनमूल्ये आणि संस्कार समाजात रुजविण्याचे कार्य महाराज आपल्या प्रवचनांतून, धार्मिक उपक्रमांतून आणि आचरणातून करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून पुढील मूल्यांचा संदेश दिला जातो.

- परस्त्री मातेसमान मानणे

- परधनाचा त्याग

- परान्नाचा त्याग

- परनिंदेचा त्याग

- आई-वडिलांची सेवा

- कुटुंबालाच प्रथम साधना मानणे

- प्रामाणिक श्रम करणे

- उत्कृष्ट शेतीची प्रेरणा

- गोसेवा आणि गोसंवर्धन

- व्यसनमुक्त जीवन

- सदाचार आणि नीतिमूल्यांचे पालन

- नामस्मरण आणि भक्ती

- सर्वधर्म समभाव

- राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकात्मता

 पुरस्कार व सन्मान

अध्यात्म, धर्मजागृती, समाजसेवा आणि मानवकल्याणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांना विविध पुरस्कार आणि सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

- विशेष आध्यात्मिक पुरस्कार : धर्मजागृती, अध्यात्मप्रसार आणि जनकल्याणासाठी केलेल्या योगदानाबद्दल.

- गुरुकृपा पुरस्कार : अध्यात्म, समाजसेवा आणि मानवकल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल.

- गोसेवा रत्न पुरस्कार : गोसंवर्धन व गोसंरक्षणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी.

- पोलिस प्रशासन सन्मान : कोविड काळात सामाजिक समन्वय आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासन व शिर्डी पोलिस प्रशासनाकडून गौरव.

- विश्व हिंदू परिषद सन्मान : धर्म संसद, संत संमेलन, संस्कृती रक्षक उपक्रम आणि हिंदू समाज संघटनासाठी केलेल्या कार्याबद्दल विशेष गौरव.

समाजावर झालेला प्रभाव

सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे आणि सेवाकार्यामुळे समाजातील विविध स्तरांवर सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न झाला आहे.

- लाखो भाविकांना अध्यात्म आणि भक्तिमार्गाशी जोडण्याचे कार्य.

- हजारो युवकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा.

- युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणे.

- गोसंवर्धन आणि गोसंरक्षणाबाबत जनजागृती.

- महिला सक्षमीकरणाला चालना.

- कुटुंबव्यवस्थेतील संस्कार आणि मूल्ये बळकट करणे.

- धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करणे.

- अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी योगदान.

- अन्नदान आणि सेवाभावी संस्कृती अधिक मजबूत करणे.

- ग्रामीण भागात अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न.

- माँ नर्मदा परिक्रमावासी, यात्रेकरू आणि भाविकांसाठी कायमस्वरूपी सेवाव्यवस्था निर्माण करणे.

- राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या परंपरेचा महाराष्ट्राबाहेरही प्रचार आणि प्रसार करणे.

समारोप

सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचे जीवन हे गुरुनिष्ठा, त्याग, तपश्चर्या, सेवाभाव आणि समाजकल्याण यांचा सुंदर संगम आहे. गुरुदेव राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांनी दिलेली आध्यात्मिक परंपरा आणि सेवाविचार पुढे नेण्याचे कार्य ते श्रद्धेने करीत आहेत.

             अध्यात्म हे केवळ वैयक्तिक साधनेपुरते मर्यादित नसून त्यातून समाजसेवा, मानवकल्याण आणि संस्कारक्षम समाजनिर्मिती घडली पाहिजे, हा विचार त्यांच्या कार्यातून अधोरेखित होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली धार्मिक, आध्यात्मिक आणि सेवाभावी कार्ये अनेक भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

॥ ॐ शिव जनार्दनाय नमः ॥

🙏 जनार्दन माऊलींचे जीवनचरित्र वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

ब्लॉग : https://janardanmauli.blogspot.com/

Facebook : https://fb.me/janardanmauli

हा आध्यात्मिक व प्रेरणादायी लेख आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत आणि भक्तपरिवारापर्यंत नक्की शेअर करा.

#जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #संतचरित्र #जीवनचरित्र #तपस्या #माऊली

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

भाग २० ✍️📿🌿गोळवाडीतील एकांत साधना आदमी सामवेदाच्या शोधाची दिव्य प्रेरणा🌿📿✍️

   


              जन्मभूमी दहेगावला वंदन करून स्वामीजींनी आपल्या पुढील साधना यात्रेला प्रारंभ झाला. प्रसिद्धी, मान, सन्मान किंवा लोकसंग्रह यांचा त्यांना कधीच मोह नव्हता. त्यांच्या जीवनाचा एकमेव ध्यास होता ईश्वर प्राप्ती आणि    आत्म साक्षात्कार म्हणूनच कोणालाही न सांगता ते सहजपणे दहेगाव सोडून वैजापूर तालुक्यातील गोळवाडी या छोट्याशा गावात आले. हे गाव जरी आकाराने लहान असले तरी पुढे स्वामी यांच्या तपश्चर्येमुळे ते आध्यात्मिक इतिहासात अजरामर ठरणार होते. 

             गोळवाडी मध्ये धर्मनिष्ठ, सेवाभावी आणि सात्विक रुतीच्या सौ. गंगुबाई गणपत वाघचौरे म्हणजेच सर्वांच्या प्रेमाच्या गंगुमावशी वास्तव्यास होत्या. माळी समाजातील या कुटुंबाकडे अनेक गावांमध्ये सण उत्सव नवरात्र आणि धार्मिक उत्सवाच्या काळात फुले व बेलपत्र पोहोचविण्याचा              वंश परंपरागत मान होता. त्यामुळे दहेगाव सह परिसरातील अनेक धार्मिक कुटुंबांशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता. आप्पा पाटील उगले यांच्या घरी जन्मलेले जनु बाबा लहानपणापासूनच विलक्षण भक्तिमय प्रेमळ आणि देवी वृत्तींचे आहेत हे त्या अनेकदा पाहत होत्या. त्यांच्या जीवनात घडणाऱ्या आध्यात्मिक घटनांची माहिती त्या भक्ती भावाने ऐकत आणि अंत करण्यात जपून ठेवत असत.

            आज नियतीने तोच जणू बाबा त्यांच्या दारात आणून उभा केला होता. स्वामीजींना पाहताच गंगूमावशींच्या आनंदाला पारावर पोहोचला नाही त्यांनी हातातील कामे तसेच टाकून धावत जाऊन स्वामीजींचे स्वागत केले. प्रेमाने त्यांची विचारपूस केली काही वेळ झालेल्या शांत संवदातून त्यांना एवढे समजले की स्वामीजींना काही दिवस पूर्ण एकांतात राहून तपश्चर्य, पारायण आणि ग्रंथ अध्ययन करायचे आहे. गंगू मावशी तत्काळ म्हणाल्या बाबा घरात या तुम्हाला पाहिजे ती जागा मी स्वच्छ करून देते, परंतु स्वामीजी शांतपने म्हणाले मावशी मला घरात राहायचे नाही कुणालाही कळू न देता एकांतात साधना करायची आहे. घरासमोरील मळ्यात एका झाडाखाली उभी असलेली बैलगाडी आणि तिच्या पलीकडे असलेला एक खोलगट खड्डा स्वामीजींनी दाखवला. आपल्या पती आणि मुलांना बोलावले सर्वांनी मिळून खड्डा स्वच्छ केला. दगड, कचरा बाजूला काढला गाईच्या शेनानी सर्व पवित्र केला. सावलीसाठी आच्छादन केले आणि कोणी त्या दिशेने जाऊ नये म्हणून बैलगाडी आडवी लावली. अशाप्रकारे एका साध्या खड्ड्याचे रूपांतर एका दिव्य भुयारात झाले. याच ठिकाणी स्वामीजींची अखंड तपश्चर्य सुरू झाले. पहाटे स्नान करून ते त्या एकांत स्थानी जात आणि दिवसभर ध्यान, जप, पारायण व आत्मचिंतनात राहू लागले. मावशी आपल्या मुलांमार्फत त्यांच्या फलाहारची निस्वार्थ भावनेने व्यवस्था करीत असत.

        या काळात स्वामीजी श्री एकनाथी भागवत, श्रीमद् भगवद्गीता आणि पाठ तसेच इतर अनेक धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करीत होते. अभ्यासादरम्यान श्रीमद् भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातील भगवान श्रीकृष्णाचे एक वचन त्यांच्या अंतकरणावर खोलवर उतरले. वेदांना सामवेदो§स्मी सर्व वेद भगवंताचे स्वरूप असताना श्रीकृष्णाने विशेषता सामवेदलाच आपल्या विभूतीचे स्थान का दिले असेल या एका प्रश्नाने स्वामीजींच्या अंतर्मनात प्रखर जिज्ञासा जागृत झाली. वेदातील देवी तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला. 

       दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गंगू मावशी जवळ बोलावून शांत स्वरूपात सांगितले. मावशी मला सामवेदाचा ग्रंथ हवा आहे त्याचे पारायण आणि अध्ययन करायची आहे. बघू मावशी निरागसपणे म्हणाले बाबा मला कुठे मिळेल तो ग्रंथ हेच माहीत नाही त्यावर स्वामीजी म्हणाले बोरसर गावात एका विद्वान ब्राह्मणाकडे सामवेदाचा ग्रंथ आहे तो तेथे जाऊन तो आणण्याचा प्रयत्न कर गंगू मावशी साठी हा केवळ ग्रंथ आणण्याचा प्रसंग नव्हता तो त्यांच्या आयुष्यातील संतसेवा  करण्याचा सुवर्णक्षण होता. स्वामीजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी मागे हटायचे नाही असा निश्चय त्यांनी या क्षणी मनोमन केला. पुढे त्यांच्या या दृढ निश्चयाने आणि त्यागाने संत सेवेच्या इतिहासात अजराअमर ठरेल अशी अद्भुत घटना घडणार होती. 

   पुढील भाग क्रमश: 

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

janardanmauli.blogspot.com

         जनार्दन माऊलींच्या श्रमयोग आणि सेवाभावाची प्रेरणा अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी हा लेख आपल्या परिचितांपर्यंत अवश्य पोहोचवा.

#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

भाग 19 ✍️🪷📿 वैराग्य समोर झुकला वस्तरा 🪷📿✍️

           


              मातेच्या निधनानंतर दहा दिवस उलटले दशक्रिया विधीचा दिवस उजाडला सर्व संपल्यानंतर धर्मशास्त्र प्रमाणे केस काढण्याची प्रथा होते परंतु जनु बाबांनी त्यास स्पष्ट नकार दिला. बाजीरावला सुढ उगवण्याची संधी मिळाली जणू बाबांना बळजबरीने बांधण्यात आले. परंतु न्हावी दादांचा वस्तरा आणि न्हावी दादांची वृत्ती जणू बाबांच्या केसावर चालण्याचे धाडस करू शकली नाही. 

           आता दहेगावात जणू बाबांची वाट पाहणारे कोण उरले होते होय अजूनही पिताश्री आप्पा पाटील उगले होते. धाकटे बंधू वामन आणि दत्तात्रय होते सवंगडी होते तसेच दहेगाव व परिसरातील भक्ती मार्ग स्वीकारलेले अनेक पुण्यवान माणसे होती. दहेगावच्या मंदिरातील सेवा आणि साधना अखंड सुरू होती. जवळपासच्या गावांमध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठा, धार्मिक उत्सव, पारायणे, अखंड हरिनाम सप्ताह अशा कार्यक्रमासाठी जणू बाबा बराच वेळ देत असत, त्यानिमित्ताने त्यांचा परिचय वाढत होता जन्म सामान्याची अभिरुची आणि पात्रता ओळखून शक्य तेवढी परमार्थाची प्रेरणा आणि उपदेश देण्याची मानसिकता ते जपत होते. 

           धाकटे बंधू वामन विवाह योग्य झाल्याने आप्पा पाटील यांनी त्यांच्या विवाहाची योजना आखर घरात कामासाठी सून आली वार्धक्याकडे झुकलेले आप्पा पाटलांचे मन दिवसांन- दिवस थकत चालले होते. बाजीराव वेगळा निघाल्याने गृहकलसही मंदावला होता आणि वामन आता घरची जबाबदारी सांभाळण्यात इतका सक्षम झाला होता.

         मात्र योगा नंतर दहेगाव सोडून एकांतात साधना व तपश्चर्या करण्याची जनु बाबांचे इच्छा दिवसेंदिवस प्रबळ होत होती. त्यासाठी योग्य वेळ आणि अनुमतीची आवश्यकता होती योग्य वेळ नियती ठेवणार होती परंतु अनुमती कोणाची आणि का आवश्यकता होती हे त्यांच्या पुढील जीवनातील महत्त्वाच्या परिवर्तनाकडे पाहिल्यावर लक्षात येते .

            मानव देह जरी प्रारब्धानुसार प्राप्त होत असला तरी त्या जन्माचे माध्यम माता-पिता हेच असतात म्हणून त्यांच्या आणि त्या वंशाच्या फळाच्या गोत्राच्या तोरणातून मुक्त होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य मानले गेले आहे. धर्मशास्त्रानुसार योग्य वयात विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारणे त्यानंतर संतती द्वारे वंशपरंपरा पुढे नेणे हा त्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे. याशिवाय आणखी तीन ऋण आहेत त्यांचा विस्तार कुठे येथे अभिप्रेत नाही. स्वामीना विवाह बंधनात बांधण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता. परंतु तो यशस्वी झाला नव्हता की अद्यापही बाल ब्रह्मचारी होते. त्यांच्या जीवनाचा विचार करता गृहस्थाश्रम स्वीकारण्याची शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत संन्यास स्वीकारणे हा मार्ग खुला होता. मात्र संन्यास दिक्षेसाठी मातापित्यांची अनुमती मात्र आवश्यक मानले जाते. 

           आदी शंकराचार्य बालवयातच संन्यास स्वीकारण्यापूर्वी आपल्या मातेचे अनुमती घेतली होती. स्वामीजींनी माता माळसाबाई आता हयात नव्हती त्यामुळे तिची अनुमती घेण्याचा प्रयत्न नव्हता, होती ती फक्त केवळ पिताश्री आप्पा पाटील यांची अनुमती. जणू बाबा आता हे उचलण्यासाठी एकांतात जाण्याची आणि जन्मभूमी दहेगाव सोडण्याचे तयारी करीत होते  परंतु आप्पा पाटलांच्या दृष्टीने जाणूबाबाचा देव देव हा वेडेपणा होता. मुलगा बावळट निघाला असे ते वारंवार म्हणत अशा मानसिकतेत त्यांच्याकडे संन्यासाची अनुमती मागणे म्हणजे आढळताना आमंत्रण देण्यासारखे होते. 

            एक दिवस कराड्या स्वभावाची आप्पा पाटील भोसरीवर बसले होते. आज त्यांच्या आसपास गुड- मळणाऱ्या जनुबाबाच्या हालचाली त्यांच्या लक्षात आल्या त्यांनी करणे आवाज विचारले आप्पा पाटील अरे तुझा देव देव सोडून आज इकडे एका कतोयस तेच करण्यासाठी आपली आज्ञा हवी आहे.  

          आप्पा पाटील आजपर्यंत कधी परवानगी घेऊन देवदेव केलास ? म्हणाला येईल तशे वागतोस तुला दुसरे येते तरी काय जा जा तेच कर जनु बाबा नाही आपले परवानगी वेगळे कामासाठी पाहिजे आप्पा पाटील काय झाले काय करायचा विचार आहे. जनु बाबा तेच करायचे, ज्याला तुम्ही देव जे म्हणतात हो गया उंचावून आप्पा पाटील रागाने म्हणाले 

            देव देव हे ऐकून मला बॉस आला आहे जा खुशाल जा जाऊन बस त्या काशी विश्वनाथ समोर कायमचा तिथे चालता हो. पित्याच्या मुखातून निघालेले ते शब्द शाप होते की संताप, अनुग्रह होता, की अनुज्ञा याचा शब्दशः अर्थ काढत बसण्याची आवश्यकता जणूबाबांना वाटली नाही. जा कायमचा निघून जा इथून चालता हो याच शब्दांनी त्यांच्या जीवनातील एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. 

पुढील भाग क्रमाश:

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवन चरित्र दिव्य कार्य अलौकिक लीला आणि रोजची अमृतवाणी वाचण्यासाठी खालील लिंक ला आवश्यक भेट द्या. 

🔗Janardanmauli.blogpost.com 

माऊलींच्या विचाराचा प्रकाश भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संदेश आपल्या मित्र परिवारासोबत अवश्य शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या जीवनात आशेचा नवा केला निर्माण होऊ शकतो 

 #जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र
#माऊली #चरित्र #जयबाबाजी #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra #amrutvani #koprgoan  #nashik #verul


रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

भाग 18 ✍️⚜️🌿 मातृ सेवेचा अखेरचा दिवस आणि मातृवियोग 🌿⚜️✍️

           


             
  बाजीराव पाटलांनी पुन्हा एकदा मोठे षडयंत्र रचले. जणू बाबांची शेती, संपत्ती आणि साहित्य यावर बळाचा वापर करून त्यांनी कब्जा मिळविला. जणू बाबांना दुपारच्या अन्नातही कोणताही वाटा राहणार नाही, अशी करार पत्रे दांडगाईने तयार करण्यात आली.

            या अन्यायानंतर जणू बाबांना पुन्हा आपल्या माता म्हाळसा बाई सह एका पडक्या खोलीत निराधारासारखे राहू लागले. जीवनातील सर्व सुख सोयी हिरवल्या गेल्या होत्या, मात्र जणूबाबांच्या मनातील मातृभक्ती आणि सेवाभाव अधिकच अदृढ झाला होता. आता त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय म्हणजे मातेची सेवा.

           घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती व कुलथयाच्या आणि तुरीच्या घुगऱ्या ऊकडून दोघांचा उदरनिर्वाह होत असे. अशा परिस्थिती तही जणू बाबा मातेच्या सेवेत कोणतीही कमतरता पडू देत नसत तिला स्नान घालणं, भोजनाची व्यवस्था करणे, बिछाना तयार करणे, विश्रांतीची काळजी घेणे, तिच्या प्रकृतीची विचारपूस करणे या सर्व सेवेत ते इतके तल्लीन होत होते की त्यांना वेळ काळ आणि स्वतःचेही भान राहत नसेल. 

           मातृ सेवेत जनु बाबा स्वतःला विसरून गेले होते, परंतु नियतीने त्यांच्या आयुष्यात आणखी एका कठीण प्रसंगाची नोंद करून ठेवली होती. आता त्यांच्यावर मातेचाच वियोग सहन करण्याची वेळ येणार होती तो दुर्दैवी दिवस अखेर उजाडला. 

         इ स वी सन 1940 चालू सुरू झाले होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे उठून जणू बाबांनी प्रथम मातेचे स्नान घातले. त्यानंतर स्वतः स्नान करून त्यांनी मातेला थोडेसे गाईचे दूध पाजले उरलेले दोन घेऊन ते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पंचामृत पूजेसाठी गेले मंदिरात पूजा प्रार्थना आणि आरती यथासांग पार पडली जनु बाबांनी आरतीनंतर कापूर प्रज्वलित केला. तेवढ्यात घराच्या दिशेने घाईघाईने आवाज आला "भाऊजी ...... लवकर या भाऊजी लवकर या .......बघा  बाई कशा करू राहिल्या या लवकर ........

              वहिनींचा घाबरलेला आवाज ऐकतात जणू बाबा क्षणाचाही विलंब न करता घराकडे धावले. घरात पोहोचतात ते मातेजवळ बसले आणि व्याकुळ स्वरात तिला हाक मारू लागले बाई बाई काय झाले ग डोळे उघड ना ..... माझ्याकडे बघ ..... बाई 

           मातेचा देह थंड पडू लागला होता श्वास ही मंदावत चालला होता. त्या अंतिम क्षणी तिने मोठ्या प्रयत्नाने किंचित डोळे उघडले जनु बाबांनी तुळशीपत्र आणि तीर्थ तिच्या मुखात ठेवले. पुत्राचे मुख शेवटच्या वेळेस पाहण्यासाठी उघडलेला त्या नेत्रातून जणू आशीर्वादच वसुंडून वाहत होते आपल्या लेकराला भरभरून आशीर्वाद देऊन झाले आणि काही क्षणातच तिचे डोळे शांतपणे बंद झाले पुन्हा कधी होऊन उघडण्यासाठी तिचा ताना तिच्याजवळच होता परंतु आता ती यशोदेच्या कान्हा जवळ निघून गेली होती.  हरी हरी ओम शांती 

             मोहिते घराण्यात जन्मलेले आणि तेथून सद्गुण संस्कार व सात्विकता सोबत घेऊन उगले पाटलांच्या घरात आलेली संयमी पुण्यशील म्हाळसा आज अखंड सहभाग्याचे कुंकू मस्तकी धारण करून या जगाचा निरोप घेत होती मंदिरात पूजासाठी ठेवलेला कापूर आठवतात जणू बाबांच्या अंतःकरणात सहज शब्द उमटले

कापराची वाती ! उजळली ज्योती !!

ठायीच समाप्ती ! झाली ताई तैशी !!

मातृ वियोगाने जणूबाबत आंतरबाह्य व्यथीत झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता ते मातेच्या चरणी अश्रू अर्पण करीत होते आणि दुसरीकडे ग्रामस्थ तिच्या अंतकरणाची तयारी करीत होते काही वेळातच मातेचा ध्येय पंचतत्वात विलीन झाला आणि तिची आत्म ज्योत श्री पांडुरंगाच्या चरणी झाली. 

पुढील भाग क्रमाश:

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवन चरित्र दिव्य कार्य अलौकिक लीला आणि रोजची अमृतवाणी वाचण्यासाठी खालील लिंक ला आवश्यक भेट द्या. 

🔗Janardanmauli.blogpost.com 

माऊलींच्या विचाराचा प्रकाश भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संदेश आपल्या मित्र परिवारासोबत अवश्य शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या जीवनात आशेचा नवा केला निर्माण होऊ शकतो 

 #जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र
#माऊली #चरित्र #जयबाबाजी #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra #amrutvani #koprgoan  #nashik #verul

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

भाग 17 🚩✍️ पंढरीची वारी गुरुकृपा आणि विठ्ठल भक्तीचा उदय ✍️🚩

               


  आता जणू बाबांना पंढरपूरचे वारी करावीशी वाटू लागले श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांच्या अंतःकरणात दिवसेंदिवस अधिकच प्रकार होत होती पवित्र वृत्तीच्या माळसा माता नाही त्यांच्या या संकल्पना आनंदाने अनुमोदन दिले प्रवासासाठी आवश्यक खर्च दिला प्रेमाने शिदोरी आणि विठ्ठल दर्शनाचे तळमळ याच दोन गोष्टी जनु बाबांच्या प्रवासाचे खरी ताकद ठरल्या भक्तांच्या आमदारांना जेव्हा विठ्ठल भेटीचे आज निर्माण होते तेव्हा प्रत्येक पाऊल आपोआप पंढरीच्या दिशेने वळू लागते. 
             एकदा पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने जात असताना एका घरासमोर भाविकांची मोठी गर्दी दिसली चौकशी केली असता समजले की वारकरी संप्रदायातील अत्यंत अधिकारी व्यक्तिमत्व सर्वांच्या श्रद्धेचे आणि आदराचे स्थान असलेले हरिभक्त परायण लक्ष्मण बुवा वाघोलीकर येथे मुक्कामी आहेत बाहेर त्यांच्या नावाचा फलक ही लावलेला होता सद्गुरूंची भेट ही योगायोग नसते ती ईश्वराने आधीच निश्चित केलेली उपाययोजना असते जनावा जन्मातच ज्ञान आणि वैराग्य घेऊन आले होते तरीही त्यांनी गुरुपरंपरेचे महत्व मनोभावे स्वीकारले. 
               उपजत ज्ञानी अशा अवतार पुरुषाने देखील गुरूंच्या चरणी नम्रतेने मस्तक टिकवून गुरुमंत्राचा अनुग्रह घेतला आहे त्याच पवित्र परंपरेचा आदर्श समोर ठेवून जणूबाबा हरिभक्त परायण लक्ष्मण बुवा वाघोलीकरांच्या चरणी उपस्थित झाले. 
ह भ प लक्षण बुवा वाघोलीकर बाळा कुठून आलास ?
जणूबाबा गुरुवर्य मी दहेगाव इथून आलो आहेत.
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर काय व्यवसाय करतोय ?
 जणू बाबा शेती हा माझा व्यवसाय आहे. 
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर मग येथे येण्यामागचा हेतू काय ?
जणू बाबा गुरुदेव आपल्या श्रीमुखातून मंत्रानुग्रह प्राप्त व्हावा. हीच माझी विनम्र इच्छा आहे. 
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर बरं सांग तुझी जमीन कशी आहे ?
जणू बाबा गुरुदेव जमीन कसदार आहे. 
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर मशागत केलीस का ?
जणू बाबा होय नांगरणी व वखरणी हरळ, कुंदा सर्व तयारी पूर्ण केली आहे. 
ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर जमिनीत आता काय करणार 
जणू बाबा येणार आहे गहू पेरणार आहे 
लक्ष्मण बुवा क्षणभर स्मित हास्य करत म्हणाले बाळा जशी शेती पेरणीसाठी तयार केली तसेच तुझं अंतकरणही साधण्यासाठी तयार झाला आहे..... हे उजवा कान माझ्याकडे कर !
           जणू बाबांनी अत्यंत नम्रतेने उजवा कान पुढे केला. लक्ष्मण बुवांनी त्यांच्या कानात गुरु मंत्राचा पवित्र उपदेश केला. त्या क्षणी गुरू कृपेचा दिव्य स्पर्श बाबांच्या अंतकरणात उतरला आणि त्यांच्या जीवनाला परमार्थाची नवी दिशा मिळाली. 
          गुरु मंत्र हा केवळ उच्चारला जाणारा शब्द नसतो तो जीवनाला ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारा दिव्य प्रकाश असतो. ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर नियमाने पंढरीची वारी करीत जा जनु बाबा गुरुदेव काही अडथळा आला आणि वारी करता आली नाही तर मला क्षमा करावी .
         ह भ प लक्ष्मण बुवा वाघोलीकर तसे असले तरी कचरू नकोस जेथे राहशील तेथून परमार्थाचे प्रेरणा जन सामान्यांना देत राहा तुझ्या प्रेरणांनी जर एखादा भक्त पंढरीची वाट धरू लागला तर त्या वारीचे पुण्य तुलाही लाबेल जा श्री विठ्ठल तुझ्या कार्याला यश देवो. 
         खरा वारकरी स्वतः पुरता भक्तिमार्ग चालत नाही, तो असंख्य जीवांना विठ्ठलाच्या चरणाशी जोडण्याचे पुण्यही कमावतो. जनु बाबांनी पुन्हा दंडवत घालून गुरुची विषम मागितले आणि प्ररतीचा प्रवास सुरू केला कालांतराने पायाची शक्ती सीन होत गेली नियमित पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे कठीण होऊ लागले, तेव्हा त्यांच्या अंतर्गत एक पवित्र संकल्प उदयास आला पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी गावातच प्रतिष्ठित केले तर नियमित दर्शन पूजा आणि सेवा घडेल. 
          जेथे भक्तीचा संकल्प शुद्ध असतो तेथे ईश्वर स्वतःला त्या संकल्पची पूर्तता करण्यासाठी मार्ग निर्माण करतो. तो संकल्प सत्य होतो कारण तो सत्पुरुषाचा संकल्प होता सत्य संकल्पाचा दात नारायण हे शास्त्र वचन अक्षरशः खरे ठरले मूर्ती मिळाल्या शुभ मुहूर्त मिळाला मंदिर मिळाले आणि प्राणप्रतिष्ठाही संपन्न झाली हा काळ इसवी सन 1939 चा असावा तर हा त्या घराजवळ दगड मातेचे एक छोटेसे मंदिर उभारण्यात आले. त्या मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आकर्षक मूर्तीची स्थापना झाली आणि परमार्थाच्या पवित्र कार्याचा मंगल श्री गणेशा झाला. जन्म कुंडलीतील फलादेशाप्रमाणे हे कार्य परमार्थिक आणि सार्वजनिक होते. त्यामागे स्वतः समाजाच्या कल्याणाची निर्मळ भावना होती. 
           मंदिरांची भव्यता दगड विटात नसते ती भक्तांच्या श्रद्धेत , सेवाभावात आणि ईश्वर निष्ठेत असते मंदिर लहान होते पण भावना विशाल होती मूर्ती लहान होत्या पण श्रद्धा पतंग होती नंदादपाची ज्योत छोटी होती पण तिचा आध्यात्मिक प्रवास असीम होता मंदिरातील घंटीचा आवाज लहान होता  असला तरी त्याचा प्रतिध्वनी भाविकांच्या अंतर्गत दूरवर गोमात राहिला. त्या मंदिरात घंटेला स्पर्श न करता येईल निर्माण होणारी ध्वनी अनेक भाविकांनी स्वतः अनुभवले आणि आजही त्या अनुभूती श्रद्धेने सांगितल्या जातात तो केवळ चमत्कार लावतात तर सर्वव्यापी परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती आणि जणूबाबांच्या अखंड श्रद्धा भक्ती व गुरुपयोग गुरुकृपेने जागृत झालेल्या अध्यात्मिक शक्तीचे जिवंत अधिष्ठान होते. जनु बाबांनी उभारलेले ते छोटीशी मंदिर ही केवळ श्री विठ्ठल रुक्मिणीचे देवस्थान नव्हते, ते श्रद्धा, सेवा, नाम, भक्ती आणि गुरुकृपेच्या अखंड प्रेरणास्थान बनले. आजही त्या पवित्र स्मृती असंख्य भाविकांच्या अधा कानात भक्तीचा अखंड तेवत ठेवता.
                  
पुढील भाग क्रमाश:

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवन चरित्र दिव्य कार्य अलौकिक लीला आणि रोजची अमृतवाणी वाचण्यासाठी खालील लिंक ला आवश्यक भेट द्या. 

🔗Janardanmauli.blogpost.com 

माऊलींच्या विचाराचा प्रकाश भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संदेश आपल्या मित्र परिवारासोबत अवश्य शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या जीवनात आशेचा नवा केला निर्माण होऊ शकतो 

 #जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र
#माऊली #चरित्र #जयबाबाजी #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra #amrutvani #koprgoan  #nashik #verul 

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

भाग १६ ✍️⚜️🌿 कष्टाने जिंकले दारिद्र, श्रमेने जिंकली माणसं जनार्दन माऊलींचा प्रेरणादायी जीवन प्रवास🌿⚜️✍️

 


              माणसाच्या जीवनात संकटे दारिद्र्य अपमान आणि विश्वासघात हे अनेकदा अनपेक्षित पणे येतात, परंतु या सर्वांवर मात करून आपल्या कष्टाच्या बळावर यशाचे शिखर गाठणारे आणि यश मिळविल्या नंतरही विनम्रता, प्रामाणिकपणा व क्षमाशीलता न सोडणारे व्यक्तिमत्व समाजासाठी प्रेरणास्थान ठरते. जणू बाबांचे जीवन हे अशाच संघर्ष परिश्रम, समाजसेवा आणि माणूसकीच्या तेजस्वी परंपरेचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला संधीमध्ये बदलले, प्रत्येक अपमानला संयमाने उत्तर दिले आणि प्रत्येक यश समाजाच्या कल्याणासाठी अर्पण केले. त्यांचे जीवन आजही प्रत्येकाला धैर्य, कर्तुत्व आणि माणुसकीची शिकवण देणारे आहे. 

                   इसवी सन १९३४ चा मार्च महिना दुष्काळाचे सावट होते. जणूबाबांनी हार मानली नाही पहाटे उठून ते शेतात सोंगणी नंतर पडलेले कणसे व चारा गोळा करू लागले. रोज दोन मुळी प्रमाणे एका महिन्यात त्यांनी मोठी गंजी उभी केली. जगाने ज्याला कचरा समजले त्यात जणू बाबांनी संधी पाहिली मे महिन्यात चारा टंचाई निर्माण झाल्यावर लोक त्यांच्याकडे चारा विकत मागू लागले. त्या चाऱ्याच्या मोबदल्यात जणू बाबांनी एक गाय घेतली त्या गाईच्या दुधावर कुटुंबाचे पालन पोषण सुरू झाले. दारिद्र्यावर कष्टाने मिळवलेला हा पहिला विजय होता. जून १९३४ मध्ये दहेगावात शाळा नव्हती. स्वतः अडचणीत असूनही जणू बाबांनी गावाच्या भविष्याचा विचार केला गावकऱ्यांच्या आग्रहावरून त्यांनी धाकटे बंधू दत्तू बाबा व मित्राच्या मदतीने दगडी मातेची एक खोली बांधून प्राथमिक शाळा सुरू केली. अक्षर ओळखी सोबत ते मुलांना संस्काराचे धडे देऊ लागले अक्षराबरोबर संस्कार देणारी ती दहेगावची पहिली शाळा ठरली. 

                   त्याच सुमारास एक गरीब शेतकरी आर्थिक अडचणीमुळे आपली घोडी विकायला आला. जणू बाबांनी ती घोडी विकत घेतली जन्म कुंडलीत वाहन सुखाचा योग होता तो नियतीने असा पूर्ण केला. संक्रातीच्या आदल्या दिवशी गावात गुळ मिळत नसल्याचे समजल्यावर त्यांनी घोडीवरून परसोड्याच्या बाजारात जाऊन गुळाची भेळी आणली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तो गूळ विक्री ठेवला आणि दुपारपर्यंत तो सर्व संपला. हा छोटासा व्यवहार पुढे मोठा किराणा व्यवसायात रूपांतरित झाला. पुढे ते लासुरहून माल आणून माफ नफ्यावर विकू लागले प्रामाणिकपणा हेच त्यांचे भांडवल होते. व्यवसाय वाढला गोठ्यात गाई म्हशींची संख्या वाढली आणि गावात त्यांची प्रतिष्ठा निर्माण झाली. काही काळाने दहेगाव जवळील 20 एकर पांढरे मातेची जमीन विक्रीस निघाली प्रामाणिक किंमत देणारे म्हणून जमीन मालकाने ती जमीन जणू बाबांना वेगळे व्यवहार करताना अजून बाबांनी ५००० रुपयांच्या पावल्या मोजून दिल्या हा व्यवहारातील पारदर्शकपणा आणि सचोटीचा आदर्श होता. 

                  इकडे बाजीराव पाटलांची आर्थिक स्थिती खालावत गेले श्रीमंतीचे उसने अवसम संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत ते जणू बाबांच्या दुकानातून विनामूल्य किराणा माल नेऊ लागले. हा नियतीने दिलेला सूड घेण्याचा क्षण होता, पण स्थितप्रज्ञ जणू बाबा शांत राहिले. त्यांनी कधीही मागील घटनांचा उल्लेख केला नाही किंवा अपमान केला नाही. ज्याने आयुष्यभर त्रास दिला त्यालाच अन्न देण्याचे मोठे मन फक्त जनुबाबाच दाखवू शकले ही त्यांची खरी कसोटी होती आणि त्याच ते पूर्णपणे उतरले. 

                    जणू बाबांचे जीवन म्हणजे संकट, दारिद्र्य व विश्वासघात यावर कष्ट, प्रामाणिकपणा आणि क्षमाशिल होते. मिळविलेला विजय आहे कौटुंबिक विश्वासघात, दारिद्र, दुष्काळ, अपमान प्रत्येक कसोटीने त्यांना अधिक कणखर बनवले. त्यांनी स्वतःचे जीवन घडवितांना समाजाचा विचार केला नाही. आणि ज्यांनी त्रास दिला त्यांच्यासाठी मोठ्या मनाने वर्तन केले त्यांचे चरित्र ठेविले अनंत देशाची राहावी या संत वाचनाचा प्रत्यक्ष आदर्श आहे त्यांचा जीवनप्रवास प्रत्येकाला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असते तरी कष्ट प्रामाणिकपणा सेवाभाव आणि क्षमाशीलता यांच्या बळावर माणूस केवळ स्वतःचेच नवे तर समाजाचे भविष्य उज्वल करू शकतो. 

पुढील भाग क्रमश :

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवन चरित्र दिव्य कार्य अलौकिक लीला आणि रोजची अमृतवाणी बघण्यासाठी खालील लिंकल अवश्य भेट द्या

🔗janardanmauli.blogspot.com 

माऊलींचा हा विचारांचा दिवा घराघरात पोहोचावा यासाठी हा मेसेज आपल्या परिचित्यांना नक्की पाठवा तुमच्या एका शेअर मुळे कोणाचे तरी आयुष्य उजळू शकते. 

🙏🚩जय जनार्दन स्वामी 🚩🙏

रविवार, २ ऑगस्ट, २०२६

भाग १५ 🌿⚜️✍️जनार्दन माऊलींचे विश्वासघाताची पहिले कसोटी ✍️⚜️🌿

 


 1931-32 चा काळ होता दहेगाव साठी ती सकाळ भाग्योदयाचे ठरली. कारण जणूबाबा अनेक वर्षांनी गावी परतले होते. खुशाल शेठ यांनी १२ एकर जमीन दानपत्र द्वारे त्यांच्या नावावर केली होती. साधने दरम्यान झालेल्या शीत प्रकोपामुळे अधू झालेले पाय घेऊन जुना बाबा मारुतीच्या मंदिरात पोहोचले. मोहितेच्या महिला प्रतिनिधींनी त्यांना पाहिले आणि ही बातमी माळसा मातेपर्यंत पोहोचवली. आनंदाने व्याकुळ झालेली माळसा माता लेकरासारखी मंदिराकडे धावत सुटली. 

             मंदिराच्या एकट्या बसलेल्या जुना बाबाला पाहून माळाचा मातेला हुंदका पडला, लेकरा मला सोडून का बरे दूर जातोस रे असे विचारात तिने त्यांना कडकडून मिठी मारली. मथुरेत जाणाऱ्या श्रीकृष्णाला यशोदेने हाच प्रश्न विचारला होता. जनु बाबा मात्र शांत राहिले कारण मातेच्या स्नेहाच्या त्या क्षणी कोणतेही उत्तर पोहोचू शकत नव्हते. मंदिरातील उपस्थित लोकही त्यादृष्टीने गहिवरले जे झाले ते विसरून जा चल बेटा घरी जाऊ असे सांगून माळसा आता उठली. मातेची आज्ञा न मोडणारे जणू बाबा काठीच्या आधाराने उठले. त्यांची अवस्था पाहून माळसा माता पुन्हा खाली बसली व शीत प्रकोपामुळे परिणाम ऐकून तिला अश्रू अनावर झाले. त्याच दिवशी जणू बाबांनी पुन्हा पितृगृही प्रवेश केला. 

             मात्र उगले पाटील कुटुंबाची अवस्था बिकट होती. कुटुंब कर्जबाजारी झाले होते. कष्टाची सवय सुटून पूर्वीच्या पाटलकीचा मिजास वाढला होता. बहुतांशी शेती विकली गेली होती. उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित झाल्याने घरात ग्रह कलश वाढू लागला. आप्पा पाटील आजारपण व वृद्धत्वामुळे अशक्त झाले होते, तर बाजीराव पाटील वाढत्या वयासोबत अधिकच अविचारी बनले होते घरात पैसा नव्हता आणि बाजारात पद सोडली नव्हती नवीन पिढीला ध्येय होते, ना आदर्श!

             संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी बाजीरावाने जना बाबांना दर्डाहून विचारले कुठे गेला होता, इतके दिवस जणुबाबांनी सांगितले की ते करंजगावला खुशाल शेठजींच्या मळ्यात कामाला गेले होते. पैसे किती कमावून आणले ? या प्रश्नावर जनूबाबा म्हणाले पैसे नाही आणले पण खुशाल शेठजनी १२ एकर जमीन नावावर करून दिले आहे हे ऐकून बाजीराव क्षणभर शांत झाला वादळापूर्वी च्या शांतते सारखी नंतर धीराच्या स्वरात त्यांनी कागदपत्रे मागून घेतली व ती खिशात ठेवली त्या शांततेत त्यांच्या डोक्यात अमानुष्याचे भावतरंग उठले होते. 

                काही महिन्यांनी बाजीरावांनी सम्यपने जनु बाबांकडून १२ एकर जमिनीच्या दानपत्रावर सही घेतली. ही जमीन तारण ठेवून मला कर्ज हवी आहे असे सांगून त्यांनी सावकाराकडून कर्ज उचलले. कर्जाचे पैसे खिशात पडतात पाटील वाड्यात पुन्हा कलम सुरू झाला. आप्पा पाटील व बाजीराव पाटील वेगळे झाले त्यांचा राग कुटुंबाबरोबर व पर्यायाने जनु बाबांवर निघू लागला. शेवटी एक दिवस बाजीरावांनी जणू बाब व माळसा मातेला एका वस्त्राने घराबाहेर काढले ज्याने कुटुंबासाठी जमीन आणली त्यालाच कुटुंबाने बेघर केले ही नियतीची पहिली मोठी कसोटी होती. लगतच्या पडक्या खोलीत त्या मायलेकरांनी आसरा घेतला माळसा मातेने आपले दागिने विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला पण स्वाभिमान विकला नाही.

 पुढील भाग क्रमश:

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवन चरित्र दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या. 

🔗 janardanmauli.blogspot.com 

जनार्दन माऊलींच्या श्रम योग आणि सेवाभावाची प्रेरणा अधिकार अधिक समाजापर्यंत पोहोचावे यासाठी हा लेख आपल्या परीचितांपर्यंत अवश्य पोहोचावा.


गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची जीवनगाथा

 सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज – जीवन गाथा  वैयक्तिक परिचय व जीवनप्रवास  एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते लाखो भाविकांचे श्रद्...