जनार्दन माऊलींचा विरह आणि चरणांची दिव्यलीला
जनार्दनाला शिक्षा होण्याऐवजी खुशाल शेठला शिक्षणाचा धडा मिळाला होता. खुशाल शेठजींनी तो धडा धार्मिकते ने विनम्रतेने स्वीकारला. खुशाल शेठजी त्यांचा परिवार गडी मजूर करंजगाव व लगतचे पाच दहा खेड्यातील होते. सामाजींनी प्रामाणिक परिश्रमाचे व पवित्राचे महत्त्व पटवून दिले होते.
आपण बघितलं होतं की दहेगाव सोडून अपरात्री घरदार सोडून स्वामीजी बाहेर निघाले होते. तेव्हा कुठे जायचे, कसे जायचे, हे ठरविले नव्हते मात्र कशासाठी जायचे हे नक्कीच ठरवले असावे. जे ठरवले तेच घडविले आता येथे थांबण्याची आवश्यकता नव्हती. काही दिवस गावचे रहिवाशांसाठी दिले पाहिजे त्यांनाही दिव्यत्वाची महती समजून त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्यामुळे जीवन कृतार्थ होते. याच विचारांनी स्वामीजींनी करंजगावकर कर्मभूमी सोडण्याचा निर्णय जाहीर केला, तो निर्णय ऐकून सर्वजण गहिवरले. सोबत काम करणाऱ्या गडी माणसांनी स्वामींचे पाय धरले झालेला चुकांची क्षमा मागू लागले.
" क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध "सत्वपुरुष नेहमीच क्षमा शील असतात. क्षमा करण्यापूर्वीच पाहीले तर त्या गडी मजुरांच्या नेत्रातून दुःखाश्रू वाहत होते. मनापासून होणाऱ्या त्या पश्चातापाच्या अश्रू बिंदूंनी त्यांचे अपराधाचे पाप कधीच धुवून टाकले होते. तरीही त्यांना क्षमाशील वृत्तीने स्वामीजींनी जवळ घेतले, त्यांच्या पाठीवर हात ठेवून प्रामाणिक परिश्रम पावित्र्य पूर्ण करण्यासाठी पाठबळ प्रदान केले. पलीकडे उभे असलेले खुशाल शेठ भाव विवश होऊन जवळ आले.
स्वामीजींचे दोन्ही हात आपल्या छातीवर दाबून म्हणाले, आज पर्यंत आपण जणू होता आता आम्ही आपल्याला जणू बाबा म्हणणार आहोत. जणू बाबांचा जयजयकार जणू बाबा चला माझ्याबरोबर, खुशाल शेठ उद्गारले सर्व सोबत्यांचा गायी वासरांचा निरोप घेऊन व खुशाल शेठ व सोबत्यांना खुशहाल करून जनुबाबा खुशहाल शेठजींच्या मागे निघून गेले.
शेतात काम करणारे तेच लोक होते. गायी गुरे तेच होते खळे मळे अवजारे तेच होते पण जणू बाबांच्या दूरवर निघून जाण्याने सर्वांना येथील चैतन्य निघून गेल्यासारखे वाटले. गडी माणसे खड्यास स्तब्ध उभे राहिले. मात्र त्यांचे मन दूर जाणाऱ्या जणू बाबांच्या पाठमोऱ्या दर्शनासाठी मागे मागे जात होते. त्यांच्या मनाला महानते ची महती माहित झाली होती. या ठिकाणी काही मिळवायचे राहिले नव्हते. जणू बाबा तुम्ही इतके दिवस माझ्याकडे राहून काय मिळविले? गहिवरलेल्या शेठजींच्या या प्रश्नाला उत्तर देताना जनु बाबा त्यांच्याकडे पाहून फक्त हसले, कारण जुना बाबांनी काही मिळविले ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नव्हती. म्हणून दिल्याचे अधिकृत नोंदणी सह कागदपत्र जनाबाबा समोर ठेवले कोषाद शेठजींनी स्वतःचे मालकीची बारा एकर कसदार काळी जमीन जणू बाबांना दानपत्र शेडजी हे काय आहे तेव्हा शेठजी म्हणाले असू द्या जणू बाबा तुमच्या प्रेमाची व सेवेची ही अंतर उतराई आहे. कृपा करून काहीच मतप्रदर्शन न करता हे स्वीकारा. जुना बाबा उत्तरा दाखल म्हणाले, शेटजी आजपर्यंत आपला शब्द मोडला नाही. ठीक आहे दरम्यान करंजगावी असताना अशी एक घटना घडली होती की
पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तावर थंड पाण्याने स्नान करून ध्यान धारणा करण्याच्या स्वामीजींचा नियम होता. त्यानुसार जणू बाबा साधनेत बसलेले होते. डिसेंबर महिना , कडाक्याची थंडी, सर्व शिवार थंडीने निशब्द होता ना कोणाचे हालचाल, ना आवाज आणि अचानक थंडीची लाट आली. सर्व लता, वेली, पिकांचे स्थिती पांढरी झाली. जनावरे थीजली करंजगावची बोर नदी पाणी ऐवजी बर्फानी भरली. सृष्टीचे तापमान काही क्षणात कमी झाले. त्याही अवस्थेत थंड पाण्याचे स्नान, उघडा देह सिद्धास्नाची बैठक आणि ध्यानातील तंद्री तशीच होती. प्रचंड शीत कोपाची लहर कमरेखाली घोटाळून बसली. रक्तवाहिन्या संकुचित झाल्या काही मिनिटात जणू बाबांना आपल्या पायांच्या संवेदना क्षीण झाल्याची जाणीव झाली तोपर्यंत निसर्ग प्रकोप पुढे निघून गेला होता. खूप प्रयत्न करूनही जणू बाबांना उभे राहता येईना, मग प्रयासाने कसे तरी सरकत सरकत शेजारच्या कंपाऊंडच्या भिंतीचा आसरा आणि आधार घेऊन ते तिथे बसले.
सूर्य उगवला उष्णता वाढली वातावरण तापू लागले, परंतु जणू बाबांचे पाय अजूनही थंडच असल्यासारखे जाणवत होते. सोबतचे गडी मजूर जमले. चौकशी झाली चर्चा झाली उपचार झाले परंतु जणू बाबांच्या चलनांची शक्ती क्षीण च वाटू लागली. हळूहळू थोडीशी प्रगती दिसली. चालता येत होते पण चरनाची गती कमी झाली होती. त्याही अवस्थेत त्यांचे आचरणाचे गती अडकली नव्हती, थकलेले नव्हते, थांबले नव्हते अवतार पुरुषांच्या दृष्टीने पाहता जणू बाबांना आचरणाचे आचार्य होते. त्या साधण्यासाठी चरणावर फारसे अवलंबून राहण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. न जाणो यात देखील नियतीचे नाट्य असले पाहिजे
जणूबाबांचा भगवद्गीतेच्या प्रचाराचा चालण्याचा वेग मंदावला नसता तर त्यांना प्राप्त करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले असते आता जणूबाबा चालत होते, पण बालकाच्या गतीने धीमे धीमे आणि म्हणूनच असंख्य आबाल वृद्धांना जनुबाबांच्या पावलावर पाऊल टाकून परमार्थ प्रगतीच्या दिशेने चालणे सोपे होत होते. भारतीय तत्त्वज्ञान कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सर्वांना सकारात्मक पाहण्याचे सूत्र सांगते अर्थातच जे होते. ते भगवंताच्या इच्छेने होते असे मानून "जे होते ते भल्यासाठीच" असे म्हणून ते सर्व काही स्वीकारावे.
पुढील भाग क्रमश: ......
संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवन चरित्र जीवन कार्य आणि अलौकिक मुलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या 👇
janardanmauli.blogspot.com
जनार्दन माऊलींच्या श्रमयोग आणि सेवाभावा ची प्रेरणा अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचावी, होत यासाठी हा लेख आपल्या परिचितांपर्यंत आवश्यक पोहोचावा.
#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा