मातेच्या निधनानंतर दहा दिवस उलटले दशक्रिया विधीचा दिवस उजाडला सर्व संपल्यानंतर धर्मशास्त्र प्रमाणे केस काढण्याची प्रथा होते परंतु जनु बाबांनी त्यास स्पष्ट नकार दिला. बाजीरावला सुढ उगवण्याची संधी मिळाली जणू बाबांना बळजबरीने बांधण्यात आले. परंतु न्हावी दादांचा वस्तरा आणि न्हावी दादांची वृत्ती जणू बाबांच्या केसावर चालण्याचे धाडस करू शकली नाही.
आता दहेगावात जणू बाबांची वाट पाहणारे कोण उरले होते होय अजूनही पिताश्री आप्पा पाटील उगले होते. धाकटे बंधू वामन आणि दत्तात्रय होते सवंगडी होते तसेच दहेगाव व परिसरातील भक्ती मार्ग स्वीकारलेले अनेक पुण्यवान माणसे होती. दहेगावच्या मंदिरातील सेवा आणि साधना अखंड सुरू होती. जवळपासच्या गावांमध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठा, धार्मिक उत्सव, पारायणे, अखंड हरिनाम सप्ताह अशा कार्यक्रमासाठी जणू बाबा बराच वेळ देत असत, त्यानिमित्ताने त्यांचा परिचय वाढत होता जन्म सामान्याची अभिरुची आणि पात्रता ओळखून शक्य तेवढी परमार्थाची प्रेरणा आणि उपदेश देण्याची मानसिकता ते जपत होते.
धाकटे बंधू वामन विवाह योग्य झाल्याने आप्पा पाटील यांनी त्यांच्या विवाहाची योजना आखर घरात कामासाठी सून आली वार्धक्याकडे झुकलेले आप्पा पाटलांचे मन दिवसांन- दिवस थकत चालले होते. बाजीराव वेगळा निघाल्याने गृहकलसही मंदावला होता आणि वामन आता घरची जबाबदारी सांभाळण्यात इतका सक्षम झाला होता.
मात्र योगा नंतर दहेगाव सोडून एकांतात साधना व तपश्चर्या करण्याची जनु बाबांचे इच्छा दिवसेंदिवस प्रबळ होत होती. त्यासाठी योग्य वेळ आणि अनुमतीची आवश्यकता होती योग्य वेळ नियती ठेवणार होती परंतु अनुमती कोणाची आणि का आवश्यकता होती हे त्यांच्या पुढील जीवनातील महत्त्वाच्या परिवर्तनाकडे पाहिल्यावर लक्षात येते .
मानव देह जरी प्रारब्धानुसार प्राप्त होत असला तरी त्या जन्माचे माध्यम माता-पिता हेच असतात म्हणून त्यांच्या आणि त्या वंशाच्या फळाच्या गोत्राच्या तोरणातून मुक्त होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य मानले गेले आहे. धर्मशास्त्रानुसार योग्य वयात विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारणे त्यानंतर संतती द्वारे वंशपरंपरा पुढे नेणे हा त्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे. याशिवाय आणखी तीन ऋण आहेत त्यांचा विस्तार कुठे येथे अभिप्रेत नाही. स्वामीना विवाह बंधनात बांधण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता. परंतु तो यशस्वी झाला नव्हता की अद्यापही बाल ब्रह्मचारी होते. त्यांच्या जीवनाचा विचार करता गृहस्थाश्रम स्वीकारण्याची शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत संन्यास स्वीकारणे हा मार्ग खुला होता. मात्र संन्यास दिक्षेसाठी मातापित्यांची अनुमती मात्र आवश्यक मानले जाते.
आदी शंकराचार्य बालवयातच संन्यास स्वीकारण्यापूर्वी आपल्या मातेचे अनुमती घेतली होती. स्वामीजींनी माता माळसाबाई आता हयात नव्हती त्यामुळे तिची अनुमती घेण्याचा प्रयत्न नव्हता, होती ती फक्त केवळ पिताश्री आप्पा पाटील यांची अनुमती. जणू बाबा आता हे उचलण्यासाठी एकांतात जाण्याची आणि जन्मभूमी दहेगाव सोडण्याचे तयारी करीत होते परंतु आप्पा पाटलांच्या दृष्टीने जाणूबाबाचा देव देव हा वेडेपणा होता. मुलगा बावळट निघाला असे ते वारंवार म्हणत अशा मानसिकतेत त्यांच्याकडे संन्यासाची अनुमती मागणे म्हणजे आढळताना आमंत्रण देण्यासारखे होते.
एक दिवस कराड्या स्वभावाची आप्पा पाटील भोसरीवर बसले होते. आज त्यांच्या आसपास गुड- मळणाऱ्या जनुबाबाच्या हालचाली त्यांच्या लक्षात आल्या त्यांनी करणे आवाज विचारले आप्पा पाटील अरे तुझा देव देव सोडून आज इकडे एका कतोयस तेच करण्यासाठी आपली आज्ञा हवी आहे.
आप्पा पाटील आजपर्यंत कधी परवानगी घेऊन देवदेव केलास ? म्हणाला येईल तशे वागतोस तुला दुसरे येते तरी काय जा जा तेच कर जनु बाबा नाही आपले परवानगी वेगळे कामासाठी पाहिजे आप्पा पाटील काय झाले काय करायचा विचार आहे. जनु बाबा तेच करायचे, ज्याला तुम्ही देव जे म्हणतात हो गया उंचावून आप्पा पाटील रागाने म्हणाले
देव देव हे ऐकून मला बॉस आला आहे जा खुशाल जा जाऊन बस त्या काशी विश्वनाथ समोर कायमचा तिथे चालता हो. पित्याच्या मुखातून निघालेले ते शब्द शाप होते की संताप, अनुग्रह होता, की अनुज्ञा याचा शब्दशः अर्थ काढत बसण्याची आवश्यकता जणूबाबांना वाटली नाही. जा कायमचा निघून जा इथून चालता हो याच शब्दांनी त्यांच्या जीवनातील एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा