जन्मभूमी दहेगावला वंदन करून स्वामीजींनी आपल्या पुढील साधना यात्रेला प्रारंभ झाला. प्रसिद्धी, मान, सन्मान किंवा लोकसंग्रह यांचा त्यांना कधीच मोह नव्हता. त्यांच्या जीवनाचा एकमेव ध्यास होता ईश्वर प्राप्ती आणि आत्म साक्षात्कार म्हणूनच कोणालाही न सांगता ते सहजपणे दहेगाव सोडून वैजापूर तालुक्यातील गोळवाडी या छोट्याशा गावात आले. हे गाव जरी आकाराने लहान असले तरी पुढे स्वामी यांच्या तपश्चर्येमुळे ते आध्यात्मिक इतिहासात अजरामर ठरणार होते.
गोळवाडी मध्ये धर्मनिष्ठ, सेवाभावी आणि सात्विक रुतीच्या सौ. गंगुबाई गणपत वाघचौरे म्हणजेच सर्वांच्या प्रेमाच्या गंगुमावशी वास्तव्यास होत्या. माळी समाजातील या कुटुंबाकडे अनेक गावांमध्ये सण उत्सव नवरात्र आणि धार्मिक उत्सवाच्या काळात फुले व बेलपत्र पोहोचविण्याचा वंश परंपरागत मान होता. त्यामुळे दहेगाव सह परिसरातील अनेक धार्मिक कुटुंबांशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता. आप्पा पाटील उगले यांच्या घरी जन्मलेले जनु बाबा लहानपणापासूनच विलक्षण भक्तिमय प्रेमळ आणि देवी वृत्तींचे आहेत हे त्या अनेकदा पाहत होत्या. त्यांच्या जीवनात घडणाऱ्या आध्यात्मिक घटनांची माहिती त्या भक्ती भावाने ऐकत आणि अंत करण्यात जपून ठेवत असत.
आज नियतीने तोच जणू बाबा त्यांच्या दारात आणून उभा केला होता. स्वामीजींना पाहताच गंगूमावशींच्या आनंदाला पारावर पोहोचला नाही त्यांनी हातातील कामे तसेच टाकून धावत जाऊन स्वामीजींचे स्वागत केले. प्रेमाने त्यांची विचारपूस केली काही वेळ झालेल्या शांत संवदातून त्यांना एवढे समजले की स्वामीजींना काही दिवस पूर्ण एकांतात राहून तपश्चर्य, पारायण आणि ग्रंथ अध्ययन करायचे आहे. गंगू मावशी तत्काळ म्हणाल्या बाबा घरात या तुम्हाला पाहिजे ती जागा मी स्वच्छ करून देते, परंतु स्वामीजी शांतपने म्हणाले मावशी मला घरात राहायचे नाही कुणालाही कळू न देता एकांतात साधना करायची आहे. घरासमोरील मळ्यात एका झाडाखाली उभी असलेली बैलगाडी आणि तिच्या पलीकडे असलेला एक खोलगट खड्डा स्वामीजींनी दाखवला. आपल्या पती आणि मुलांना बोलावले सर्वांनी मिळून खड्डा स्वच्छ केला. दगड, कचरा बाजूला काढला गाईच्या शेनानी सर्व पवित्र केला. सावलीसाठी आच्छादन केले आणि कोणी त्या दिशेने जाऊ नये म्हणून बैलगाडी आडवी लावली. अशाप्रकारे एका साध्या खड्ड्याचे रूपांतर एका दिव्य भुयारात झाले. याच ठिकाणी स्वामीजींची अखंड तपश्चर्य सुरू झाले. पहाटे स्नान करून ते त्या एकांत स्थानी जात आणि दिवसभर ध्यान, जप, पारायण व आत्मचिंतनात राहू लागले. मावशी आपल्या मुलांमार्फत त्यांच्या फलाहारची निस्वार्थ भावनेने व्यवस्था करीत असत.
या काळात स्वामीजी श्री एकनाथी भागवत, श्रीमद् भगवद्गीता आणि पाठ तसेच इतर अनेक धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करीत होते. अभ्यासादरम्यान श्रीमद् भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातील भगवान श्रीकृष्णाचे एक वचन त्यांच्या अंतकरणावर खोलवर उतरले. वेदांना सामवेदो§स्मी सर्व वेद भगवंताचे स्वरूप असताना श्रीकृष्णाने विशेषता सामवेदलाच आपल्या विभूतीचे स्थान का दिले असेल या एका प्रश्नाने स्वामीजींच्या अंतर्मनात प्रखर जिज्ञासा जागृत झाली. वेदातील देवी तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गंगू मावशी जवळ बोलावून शांत स्वरूपात सांगितले. मावशी मला सामवेदाचा ग्रंथ हवा आहे त्याचे पारायण आणि अध्ययन करायची आहे. बघू मावशी निरागसपणे म्हणाले बाबा मला कुठे मिळेल तो ग्रंथ हेच माहीत नाही त्यावर स्वामीजी म्हणाले बोरसर गावात एका विद्वान ब्राह्मणाकडे सामवेदाचा ग्रंथ आहे तो तेथे जाऊन तो आणण्याचा प्रयत्न कर गंगू मावशी साठी हा केवळ ग्रंथ आणण्याचा प्रसंग नव्हता तो त्यांच्या आयुष्यातील संतसेवा करण्याचा सुवर्णक्षण होता. स्वामीजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी मागे हटायचे नाही असा निश्चय त्यांनी या क्षणी मनोमन केला. पुढे त्यांच्या या दृढ निश्चयाने आणि त्यागाने संत सेवेच्या इतिहासात अजराअमर ठरेल अशी अद्भुत घटना घडणार होती.
पुढील भाग क्रमश:
संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
janardanmauli.blogspot.com
जनार्दन माऊलींच्या श्रमयोग आणि सेवाभावाची प्रेरणा अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी हा लेख आपल्या परिचितांपर्यंत अवश्य पोहोचवा.
#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा